ग्लोबलनगरी मिड-वेस्ट परिवार स्नेह भेट २०१७
“ग्लोबलनगरी मिड-वेस्ट परिवार स्नेहभेट”चे आयोजन आणि नियोजन हे श्री.किशोरदादा गोरेंच्या प्रेरणेतून साकारलेला एक छोटासा प्रयत्न. किशोरदादा नेहमी म्हणतात,”जसा मॆक इन इंडिया, मॆक इन महाराष्ट्र, तसाच मॆक इन अहमदनगर हि हवाच. जिल्ह्याची प्रगती झाली कि राज्याची आणि राज्याची प्रगती झाली कि आपोआप भारताची प्रगती होईल. आपण परदेशात राहून आपल्या मातीसाठी काही देणं लागतो. आपापल्या परीने एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीने खारीचा वाटा उचलून त्यासाठी काही रचनात्मक आणि विधायक कामे करू शकलो तर जीवनाचं सार्थक होईल”.

परदेशात नेहमी आपल्या जवळच्या आप्तेष्ट आणि स्नेहींची आठवण येत असते. परंतु गावाकडच्या मातीची ओढ हि कायम खुणावत असते. त्याच मातीतली आपली माणसं एकत्र आली तर तीच मजा परदेशातही घेता येईल आणि एकमेकांच्या सहकार्याने जीवन खूप सुंदर होईल. या भावनेने ग्लोबलनगरी मिड-वेस्ट परिवाराची स्नेह भेट ठरली. निमित्त ठरलं श्री. किशोरदादा गोरे व परिवाराचे १५ वर्षांनी ओहिओ मध्ये आगमन. लगबग सुरु झाली, नियोजन बघता बघता आकार घेऊ लागले. ग्रुप मधील परिवारातील सदस्यांना आमंत्रणे गेली व तितकाच उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला.
अस्सल नगरी पद्धतीचे पदार्थ आणि भाज्यांचा बेत ठरला.

नियोजन व त्याला मूर्त स्वरूप देण्याची जबाबदारी उचलली ती सौ.स्नेहाताई व श्री.अशोकदादा माळी, सौ.सविता व श्री.अविनाश मेहेत्रे, सौ.सुजाता व श्री.उमेश पवार, सौ.अपर्णा व श्री.सुमीत जैन आणि सौ. उल्का व श्री.प्रदीप करपे यांनी.

मी “स्नेह भेट” यासाठी म्हणतोय कि, १२ तास न्यूजर्सीहुन गाडी चालवत आलेले श्री.किशोरदादा, सौ.अंजलीताई व अदिती गोरे आणि मम्मी उर्फ सरोजिनीताई, श्री.राजूभाऊ व अर्णव घोरपडे परिवार तसेच ८ तास सेंट लेविस, मिसूरीहुन गाडी चालवत आलेले श्री. संजयदादा, सौ.अनुराधाताई व मैत्रेयी भगत परिवार यांचा श्रमपरिहार झाला तो शुक्रवारी २४ तारखेला “सौ.स्नेहाताई व श्री.अशोकदादा माळी” या नगरी दाम्पत्याच्या “स्नेह” भावाने व नेहा या त्यांच्या कन्येच्या आपुलकीने. सौ.संगीताताई व निलेश इंगुळकर (केंटुकी), सौ.सुजाता व श्री.उमेश पवार आणि सौ.सविता व श्री.अविनाश मेहेत्रे व सौ.कुसुम व श्री.हरिशचंद्र मेहेत्रे (आई-वडील) परिवार सुद्धा त्यांना सामील झाले.
“आनंदाचे डोही आनंद तरंग” या ओवीचा प्रत्यय माळी दाम्पत्याच्या घरी गेल्यावर आला.
त्यांचे आदरातिथ्य व हसतमुख स्वभाव पाहून सर्व परिवार भारावून गेले. असं वाटत होतं कि सर्वजण एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखत होते. खूप छान गप्पा व नगर मधील आठवणींचा महापूर यामुळे रात्रीचे २ कसे वाजले काहीच कळले नाही.

शनिवारी दुपारपर्यंत सौ.शीतल व श्री.इंद्रजीत कोहोक(केंटुकी), सौ.हेमलता व श्री. सचिन शिंदे(डेट्रॉईट), सौ.अपर्णा व श्री.निलेश दळे(डेट्रॉईट), सौ.शिल्पा व श्री.सुविध कांकरिया(क्लीव्लॅंड), सौ.अर्चना व श्री.अनिल हरिश्चन्द्रे(डेट्रॉईट), सौ.रामेश्वरी व श्री.विजय काळे(डब्लिन), सौ.अस्मिता व विनायक शेंडेकर(कोलंबस), सौ.व श्री.प्रशांत जोशी(कोलंबस) आणि तरुण वर्गातूनही आनंद चौधरी(डेट्रॉईट), केतन पवार(डेट्रॉईट) आणि प्रचित साळुंके(डेट्रॉईट) हे परिवार स्नेह भेटीच्या कार्यक्रमासाठी वरील सर्व परिवारासहित मेहेत्रे परिवाराच्या घरी सामील झाले.
अस्सल नगरी पद्धतीचे पदार्थ आणि भाज्यांचा बेत ठरल्याप्रमाणे घेऊन सर्व परिवार हजार झाले.
तरुण सदस्यही सरसावून पुढे आले. आनंद चौधरी, केतन पवार व प्रचित साळुंके कॅमेरा ? घेऊन सज्ज झाले आणि बघता बघता कार्यक्रमाच्या रंगतदार आठवणी त्यांनी टिपल्या.

सर्वप्रथम श्री.किशोरदादांनी एकेक परिवाराला पुढे येऊन प्रथम बायकोने मग मुलांनी आणि शेवटी नवऱ्याने नाव, गाव, पत्ता, शिक्षण, लग्न, मुलांचा जन्म, त्यांचे शिक्षण, आवड, आई-वडील असे सर्व काही सहित प्राथमिक ओळख करून द्यायला लावली. हसत-खेळात एकमेकांना समजावून घेत परदेशात कधी नगरी मन समरस झाली ते कळलंच नाही.

सकाळ वृत्तपत्राचे मुख्य संपादक श्री.बाळ ज. बोठे यांचे “कारभारी जिल्ह्याचे” ह्या पुस्तकाचे श्री.किशोरदादा गोरे आणि सौ.कुसुम व श्री.हरिशचंद्र मेहेत्रे यांच्या हस्ते ग्लोबलनगरी परिवाराच्या उपस्थितीत प्रकाशित झाले. ग्लोबलनगरी परिवाराचे ग्रुप फोटो घेण्यात आले.

अस्सल नगरी पद्धतीचे पदार्थ आणि भाज्यांचा आस्वाद घेत जेवणाचा बेत रंगला. बटाटेवडा, काळ्या मसाल्याचे मटण, वाटाणा बटाटा, डुबुकवडा, जीरा राईस, फोडणीचा वरण, मठ्ठा, सलाड व वांग इत्यादी पदार्थांचा ग्लोबलनगरी परिवाराने आस्वाद घेतला.

परिवारातील सर्व सदस्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी “सांस्कृतिक कार्यक्रमांचेही” आयोजन केले होते. प्रथम सई पवार, आयुषी मेहेत्रे व सई करपे यांनी “गणरायाचे गुणगान” करणारे नृत्य सादर केले. इशा कांकारियाने “नवराई माझी लाडाची लाडाची ग” वर सुंदर नृत्य सादर केले. नीलिका इंगुळकर या चिमुरडीने सुंदर नर्सरी राईम्स वर ठेका धरला तर कु.काळे याने खणखणीत आवाजात पोवाडा गायला. अर्णव घोरपडे याने सर्वांनाच छान कोडे घालून मजा आणली. प्रशांत जोशी यांनी गिटार व गायनाने सर्वांचे मनोरंजन केले. उमेश पवार यांनी हिंदी चित्रपट गीते गायली. अपर्णा जैन यांनी सुंदर मराठी व हिंदी गीते गायली. सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता हि संगीताताईच्या सुरेल आणि भावपूर्ण भजनांनी व निलेश इंगुळकर यांच्या सुश्राव्य पखवाज वादनाने केली.
आनंद चौधरी या तरुण नेतृत्वाने ग्लोबलनगरी परिवाराचे उद्दिष्ट व ध्येय सांगत नवीन टेलिग्राम अँप च्या वापराचे आवाहन सर्व परिवारांना केले.
किशारदादांनी व अंजलीताईंनी सर्व परिवारांशी संवाद साधत नवीन कल्पना आणि उद्दिष्ठासाठी मार्गदर्शन केले. नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन स्थापन करणे, त्याचे सर्वांना फायदे, नवीन कल्पना सर्वांनी दिल्या पाहिजे व वोलून्टिरिन्ग अवर सर्टिफिकेशन हाईस्कूल स्टुडन्ट ला देणे इत्यादी विषय हाताळले.
रविवारी सकाळी मिसळ ब्रेड खाऊन सर्व परिवाराचे छान पैकी फोटो सेशन झाले.
सर्वांना स्नेह भेट कार्यक्रमाची आठवण म्हणून “ग्रुप फोटो फ्रेम” देऊन कार्यक्रमाचा समारोप केला.

श्री.किशोरदादा गोरे व परिवार(१२ तास ड्राईव्ह) व श्री.संजयदादा भगत व परिवार(८ तास ड्राईव्ह) यांना खूप खूप धन्यवाद आणि सलाम!!

मेरिसविल्ले, डब्लिन, केंटुकी, डेट्रॉईट, ग्रँड रॅपिड, इंडियानापोलीस, सेंट लेविस व न्यूजर्सी या भागातील सर्व ग्लोबलनगरी परिवारातील सदस्यांचे पुनश्च आभार तुमच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल?

निघताना मात्र दोन दिवसात चटका लावून जाणाऱ्या आपल्या परिवाराच्या निरोपाने हुंदके आवरेनासे झाले. साश्रू नयनांनी सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि नकळत पुढच्या स्नेह भेटीचे आश्वासन दिले गेले.