ग्लोबलनगरी परिवार व जिल्हा परिषद शाळा, अहमदनगर यांचा विद्यार्थी व शिक्षक सुसंवाद- २०१८

संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे,
“आधी बीज एकले
बीज अंकुरले, रोप वाढले
एका बीजापोटी, तरु कोटी कोटी
जन्म घेती सुमने फळे.”

जसा एका बीजापासूनच अनंत मधुर आणि रसाळ फळे देणाऱ्या डेरेदार वृक्षाचा जन्म होतो, तसा छोट्या छोट्या उपक्रमांमध्येच मोठी स्वप्नं साकारण्याची महत्वाकांक्षी उमेद लपलेली असते.

श्री.किशोरदादा गोरे व मा.श्री.रमाकांतजी काठमोरे साहेब (शिक्षणाधिकारी) यांच्या संयुक्त प्रयत्नातून “आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनी” साकारलेला उपक्रम म्हणजेच “एकाच दिवशी जगभरातून ग्लोबलनगरी परिवारातील सदस्यांनी ६० जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी भरभरून साधलेला सुसंवाद”

सर्वप्रथम iso मानांकित राहुरी नगरपालिका, नूतन मराठी शाळा नं.९ येवलेवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांनी परदेशातील पाहुण्यांशी सवांद साधण्याची धुरा अप्रतिमपणे व लीलया पेलणारे श्री.नवनाथ लाड सर तुमचे ग्लोबलनगरी परिवारातर्फे मनस्वी अभिनंदन?

मुख्याध्यापिका सौ.छाया थोरात, श्री.दिनकर कुदळ, सौ.वर्षा बोरुडे, श्री.नवनाथ लाड सर, सौ.सविता वांढेकर, सौ.कल्पना काळे यांनी ग्लोबलनगरीच्या v. c. साठी खूप कष्ट घेतले व कार्यक्रम एका रात्रीतून सर्व मान्यवरांशी समन्वय साधून मान्यवरांचा व विद्यार्थ्यांचा परदेशातील पाहुण्यांशी सुसंवाद घडवून आणला. शाळेने कृतीतून त्यांच्या उपक्रमाबद्दलच्या उत्स्फूर्ततेची चुणूक दाखवून दिली. सौ.वर्षा बोरुडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

ओजस नवनाथ लाड या ५वीतल्या विद्यार्थ्याने शाळेत व्हिडीओ कॉन्फरन्सची तयारी केली, हि अत्यंत कौतुकाची बाब ठरली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांची ओळख करून देण्यात आली. त्यांच्या कार्याचा उल्लेख व आलेख गौरविण्यात आला. विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत अतिशय सुरेख गीत गायले. त्यांचे भाषेवरचे प्रभुत्व पाहून मन अचंबित झाले. विद्यार्थ्यांनी ढोल-ताशा आणि लेझीमवर ठेका धरत अवघा कार्यक्रम एका वेगळ्याच हर्षोल्हासित वातावरणाने भरून टाकला. मन त्या ठेक्यावर नकळत ठेका धरू लागले.

विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उमेश पवार यांनी खूप ओघवत्या भाषेत उत्तरे दिली. ग्लोबलनगरी टीमचा उद्देश व श्री. किशोरदादा यांची त्यामागची भूमिका सर्वांना समजावून सांगितली.

उमेश पवार आणि सुमित जैन यांनी विद्यार्थी, पालक शिक्षक, अधिकारी व पदाधिकारी यांचेशी सुमारे २ तास अमेरिकेतून गप्पा मारल्या.

प्रशासनअधिकारी श्री. मोहनीराज तुंबारे साहेब यांनी शाळेने आजपर्यंत कशी प्रगती केली हे आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
राहुरी नगरपालिकेच्या सन्माननीय मा.नगराध्यक्षा डॉ. सौ. उषाताई तनपुरे यांनी राहुरी नगरपालिका शाळेसाठी करत असलेल्या कामांची माहिती देऊन ग्लोबल नगरीच्या या स्तुत्य उपक्रमा चे कौतुक केले. उपनागराध्यक्षा सुमती सातभाई , मा.नगरसेवक सूर्यकांत भुजाडी पत्रकार भाऊसाहेब येवले ,संजय भांड,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष *संजय कोकाटे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे मनमोकळ्या शिक्षण पद्धती विषयी गप्पा मारल्या .
पत्रकार श्री. भाऊसाहेब येवले यांनी व्यसनमुक्ती, शिक्षण पद्धती, याविषयी खूप गप्पा मारल्या व समस्त पालकांनी देखील व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.

वृक्षारोपण, परदेशातील शिक्षण यांविषयी श्री.उमेश पवार व सुमित जैन यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.

मा.सयाजी शिंदे यांच्या “देवराई” ह्या उपक्रमाच्या वृक्षारोपण महत्व व ग्लोबलनगरी परिवाराचे उपक्रम यांना त्यांचे असलेले समर्थन या व्हिडिओ वरील संभाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कृपया पुढच्या पेज साठी खाली नंबर वर क्लिक करा…..