ग्लोबलनगरी परिवार व जिल्हा परिषद शाळा, अहमदनगर यांचा विद्यार्थी व शिक्षक सुसंवाद- २०१८

“गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा” या सुंदर गीताच्या ओळी लहानपणी ऐकल्या होत्या. अमेरिकेत नोकरीनिमित्त आल्यावर श्री.किशोरदादांच्या “जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी परदेशातून सुसंवाद” ह्या ग्लोबलनगरीच्या उपक्रमा अंतर्गत त्या सुंदर गीतातील ओळींना प्रत्यक्षात साकारण्याची संधी मिळाली. उद्देश एकच,”आपण जरी परदेशी स्थित असलो तरी जन्मभूमीचे काही देणे लागतो, ते ज्ञानाच्या स्वरूपात फुल ना फुलाची पाकळी म्हणून परत द्यावे.”

त्या उपक्रमा अंतर्गत उमेश पवार, सुमीत जैन, अशोकदादा माळी व नेहा माळी यांना शाळेतील विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरेन्स वरून सुसंवाद साधण्याची संधी मिळाली.

पहिली शाळा होती,”जिल्हा परिषद शाळा, शहर टाकळी, शेवगाव”. तेथील शिक्षक श्री.राजाभाऊ इंगळे सर, हे अतिशय मेहेनती आणि उत्साही होते. इंगळे सरांशी संपर्क साधून व्हिडिओ कॉन्फरेन्ससाठी शाळा सज्ज असल्याची खात्री केली.

प्रमुख पाहुणे सौ.राऊळ मॅडम (गटशिक्षण अधिकारी), श्री.शिवाजीराव गवळी (चेअरमन & डायरेक्टर साखर कारखाना), सौ.बर्डे मॅडम (प्रिन्सिपॉल), श्री.शेटे सर (केंद्रप्रमुख) शाळेत आले. व्हिडिओ कॉन्फरेन्सवर श्री. इंगळे सरांनी स्वतःची, प्रमुख पाहुण्यांची, विद्यार्थ्यांची आणि शाळेतील व्यवस्थापन व पालकांची ओळख करून दिली.
विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर समूहगीत “जय महाराष्ट्र” अगदी सुरेल आवाजात सादर करून वातावरण भारावून टाकले. श्री. किशोरदादा व “ग्लोबलनगरी परिवार” यांच्या ध्येयाची, मातृभूमीसाठी काहीतरी करण्याची प्रबळ इच्छा, तळमळ आणि अहमदनगर जिल्ह्याशी असलेले नाते, या बाबत श्री.उमेश पवार यांनी माहिती दिली.

अमेरिकेतील शाळा व भारतीय शाळा यातील शिक्षणपद्धती याबद्दलची माहिती श्री.सुमीत जैन यांनी सांगितली. अमेरिकेत पाळत असलेली वाहतुकीची शिस्त आणि स्वच्छता या बद्दलची त्यांनी माहितीहि विद्यार्थ्यांना दिली.

नेहा माळी यांनी कॅन्सर रीसर्च मधील माहिती तसेच अशोकदादा माळी हे स्वतः माजी शिक्षक असल्याने त्यांनी शिक्षक व पालक यांच्या प्रश्नांना पूरक उत्तर देऊन खुश केले.

सौ.राऊळ मॅडम यांनी दोन्ही शिक्षण पद्धतीतीतील बारकावे जाणून घेतले. त्यांनी भारतीय शिक्षण पद्धतीत काय बदल हवे? का हवे याबद्दल सविस्तर चर्चा केली. करिअर मार्गदर्शन व शिक्षण व्यवस्था यांच्या अमेरिकेत कसा ताळ-मेळ घातला आहे या बद्दल उमेश पवार यांनी सविस्तर माहिती दिली.

सई उमेश पवार व श्रेया सुमित जैन यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद मराठी व इंग्रजीतून साधला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या आवडी-निवडीच्या व शालेय शिक्षणासंदर्भातील प्रश्न उत्तर सत्र छान झाले.

सौ.राऊळ मॅडम (गटशिक्षण अधिकारी व इंगळे सरांनी आभार प्रदर्शन करून दोन तास चाललेला हा व्हिडिओ कॉन्फरेन्स संपन्न झाला.

कृपया पुढच्या पेज साठी खाली नंबर वर क्लिक करा…..