ग्लोबलनगरी परिवार व जिल्हा परिषद शाळा, अहमदनगर यांचा विद्यार्थी व शिक्षक सुसंवाद- २०१८

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या ग्लोबल नगरी या उपक्रमा अतर्गत आज शनिवार दिनांक ०८/०९/२०१८ रोजी सकाळी ८ :३० ते ११:३० या वेळात ग्लोबल नगरी उपक्रमांतर्गत व्हिडीओ कॉन्फरन्स  च्या माध्यमातून अतिशय आनंदाच्या वातावरणात अमेरिका या देशात उच्च पदावर कार्यरत असलेले डॉ.विनायक खोडदे आणि सौ.उज्वला खोडदे यांनी डेरेशिवार शाळेशी व निलेश मते यांनी कळस शाळेशी  संपर्क साधला शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट सवांद साधला. एक अनोखा अनुभव या निमित्ताने त्यांना मिळाला.
          आदरणीय डॉ.विनायक खोडदे ,उज्वला खोडदे व निलेश मते यांनी   विद्यार्थी, पालक शिक्षक, अधिकारी व पदाधिकारी यांचेशी सुमारे तीन तास अमेरिकेतून गप्पा मारल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेतल्यामुळे आम्ही यशस्वी झालो असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांपेक्षा मराठी शाळा निश्चितच चांगल्या असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.
              पारनेर पंचायत समितीचे सदस्य दिनेश दादा बाबर ,गटशिक्षण अधिकारी श्री.बुगे साहेब पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री.खामकर साहेब ,श्री.संभाजी झावरे साहेब,श्रीमती.कार्ले मॅडम केंद्र प्रमुख सागर साहेब,शिरसाठ सर ,नरसाळे सर ,एरंडे सर  व ग्रामस्थ उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक व राज्यतंत्रस्नेही शिक्षक श्री गोरक्ष पावडे यांनी डेरेशिवार शाळेने आजपर्यंत कशी प्रगती केली हे आपल्या प्रास्ताविकात सांगितले.व कळस शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक श्री.दत्तात्रय रेपाळे यांनी आपल्या प्रास्थाविकात शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला.समस्त पालकांनी देखील व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.व   वृक्षारोपण, परदेशातील शिक्षण यांविषयी पाडळी आळे गावचे सरपंच श्री भाऊसाहेब डेरे यांनी उभयताना धन्यवाद देत त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या.तसेच रांधे गावचे उपसरपंच श्री.संतोष काटे यांनी विद्यार्थांना शिस्त लावण्यासाठी कोणती उपाययोजना केली जाते यावर चर्चा केली डेरेशिवार शाळा व्यवस्थान समितीचे अध्यक्ष श्री सतीश डेरे ,बाबाजी डेरे ,भास्कर डेरे ,संतोष डेरे ,रामदास डेरे आदी ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.तसेच कळस गावाचे सरपंच श्री

 

            मुलांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे डॉ.विनायक खोडदे आणि सौ.उज्वला खोडदे व निलेश मते यांनी  खूप ओघवत्या भाषेत उत्तरे दिली. ग्लोबल नगरी टीम चा उद्देश समजावून सांगितला. भारतात आल्यास शाळेला नक्की भेट देण्याचे डॉ.विनायक खोडदे आणि सौ.उज्वला खोडदे व निलेश मते यांनी  आश्वासन दिले.तसेच आमचे मित्र बनून राहण्याचे व सतत मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही उपलब्ध असू असे त्यांनी आवर्जून सांगितले .
          जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या डेरेशिवार व कळस शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचेसाठी हा अतिशय आगळा वेगळा अनुभव होता. आज  डेरेशिवार व कळस शाळा अमेरिकेत पोहोच झाल्यामुळे मनस्वी आनंद होत आहे. याबद्दल ग्लोगल नगरी टीम, आदरणीय काठमोरे साहेब, आदरणीय श्री किशोर गोरे सर, श्री रवी भापकर सर व श्री.सुमित जैन सर ,उमेश पवार सरांचे मनापासून धन्यवाद.आपला आवाज वृत्तवाहिनीचे  प्रतिनिधी उत्तम घोलप या वेळी आवर्जून उपस्थित होते.

 

         कळस शाळेचे मुख्याध्यापक मारुती अनंत.तंत्रस्नेही शिक्षक दत्तात्रय रेपाळे पदवीधर शिक्षक पांडुरंग शिरोळे,तंत्रस्नेही शिक्षक हेमंत हिंगमिरे ,अशोक डेरे,दादाभाऊ बेलोटे,दौलत चौधरी,तसेच डेरेशिवार शाळेचे राज्यतंत्रस्नेही शिक्षक श्री.गोरक्ष पावडे व ज्योती गवळी  यांनी ग्लोबल नगरीच्या व्हिडीओ कॉन्फरन्स साठी खूप कष्ट घेतले.व कार्यक्रम यशस्वी केला.

कृपया पुढच्या पेज साठी खाली नंबर वर क्लिक करा…..