ग्लोबलनगरी परिवार व जिल्हा परिषद शाळा, अहमदनगर यांचा विद्यार्थी व शिक्षक सुसंवाद- २०१८

चिमुकल्यांना मिळाला अमेरिका अनुभवण्याचा आनंद 
नमस्कार मित्रांनो
काल सकाळी आपल्या जि. प. शाळा दहिगाव ने येथे “ग्लोबल नगरी VC”हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
याद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांना मूळचे दहिगाव ने येथील असणारे आणि सध्या न्यूयॉर्क अमेरिका येथे पोलीस दलात कार्यरत असणारे मा.श्री. कल्याण घुले सर यांनी आपला बहुमोल वेळ देऊन व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे महत्त्वाचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला तसेच मनमोकळ्या गप्पा देखील केल्या.
या कार्यक्रमासाठी मा.सरपंच सुभाष नाना, उपसरपंच मा.श्री.राजाभाऊ पाऊलबुद्धे साहेब, सुरेश पा.घानमोडे, कडुबाळ पा घुले,पांडुरंग खंडागळे,विठ्ठल घुले, वाजीद मेजर,पंचायत समितीचे विषय तज्ञ श्री. खडके सर, नरेंद्रनगर शाळेचे मुख्याध्यापक श्री.खंडागळे सर यांच्यासह विविध ग्रामस्थ मंडळी आवर्जून उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती भुसे मॅडम, त्याचबरोबर उपाध्यापक श्रीम.धर्माधिकारी, श्रीम.परदेशी, श्री.मुकुंद जोशी श्रीम. चौधरी , श्रीम.खंडागळे, श्रीम.भणगे तसेच श्री. रामेश्वर जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय आनंदाचा आणि कुतूहलाचा क्षण होता. सकाळपासूनच मुले व शिक्षक खूप उत्साही दिसत होते. अमेरिकेत तेव्हा शुक्रवारच्या रात्रीचे बारा वाजले असताना देखील श्री कल्याण घुले सर यांनी जवळपास दोन तास सर्वांशी हितगुज करून आपला प्रेरणादायी प्रवास आणि विद्यार्थ्याच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच भारतात आल्यावर दहिगाव शाळेस निश्चित भेट देण्याचे सांगितले.
तांत्रिक नियोजन रामेश्वर जाधव यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भुसे मॅडम यांनी केले सूत्रसंचालन जोशी सर आणि आभार जाधव सर यांनी मानले.